…खूप फोन केले पण उत्तर आलं नाही !

July 14, 2011 5:11 PM0 commentsViews: 7

किरण सोनावणे, मुंबई

14 जुलै

झवेरी बाजारात झालेल्या बॉम्बस्फोटाने 17 जणांचे बळी घेतले. त्यातलेच एक लालचंद राधाकिशन आहूजा. घरात कमावणारे लालचंद एकटेच होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबाचा आर्थिक कणाही मोडला.

लालचंद राधाकिशन हे उल्हासनगरचे राहणारे. इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करायचे. कामानिमित्त नेहमी झवेरी बाजारात जायचे. कालही गेले. मुंबईतून घरी काही आणायचंय का म्हणून संध्याकाळी फोनही केला. पण काही वेळातच बॉम्बस्फोट झाला. घरच्यांनी खूप फोन केले पण काही उत्तर आलं नाही.

जवळपास साडे आठ वाजता फोन लागला. पण फोनवर लालचंद नव्हते. त्यांचा मुलगा सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये गेला. पण त्याआधीच लालचंद यांनी जगाचा निरोप घेतला होता. लालचंद घरी कमावणारे एकटेच होते. घरी पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. एका मुलीला मेंदूचा विकार आहे. दोन्ही मुलींची लग्न व्हायची आहेत. त्यांच्या जाण्याचं दु:ख तर आहेच पण आता या कुटुंबासमोर आर्थिक संकटही उभं राहिलं आहे.

close