सुरक्षा यंत्रणेत मूलभूत बदल करण्याची गरज – राम प्रधान

July 16, 2011 2:29 PM0 commentsViews: 7

15 जुलै

मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा चौकशी अहवाल राम प्रधान समितीने सरकारला सादरही केला होता. अहवाल सोपवला त्यालाही आता एक वर्षं उलटलं पण गेल्या वर्षभरात सरकारने या अहवाला संदर्भात त्यातील सूचनांसंदर्भात सरकारने कोणतीही चर्चा राम प्रधान समितीशी केलेली नाही अशी खंत खुद्द राम प्रधान यांनी व्यक्त केली. आयबीएन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

26/11 चौकशी अहवाल तयार करत असताना पुण्याला भेट दिली होती आणि कोरेगाव पार्कसारख्या ठिकाणी अतिरेकी हल्ला किंवा बॉम्बस्फोट होऊ शकतो अशी भीती आधीच व्यकत केली होती असंही राम प्रधान यांनी सांगितले. खरं तर आता सुरक्षा यंत्रणेतच मूलभूत बदल करण्याची गरजही राम प्रधान यांनी व्यक्त केली. गृहखात्यासारख्या ठिकाणी केवळ कागदी घोडे नाचवून कामं होत नाहीत असंही राम प्रधान यांनी या खास मुलाखतीत सांगितले.

close