पार्वती मिस वर्ल्ड स्पर्धेत दुस-या स्थानावर

December 14, 2008 9:02 AM0 commentsViews: 3

13 डिसेंबर जोहान्सबर्गसाऊथ आफ्रिकेतल्या जोहान्सबर्गमध्ये मिस वर्ल्ड 2008 स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. भारताचं प्रतिनिधीत्व करणा-या पार्वती ओमनाकुट्टनकडे सगळ्यांचे डोळे लागले होते .शेवटच्या पाचमध्ये निवड झाल्यानंतर सर्वांना तिच्याकडून अपेक्षा होत्या. पण शेवटी मिस रशिया केसिना सुखिनोव्हाने मिस वर्ल्ड 2008 चा किताब पटकावला. तिसरा नंबर त्रिनिनाद टोबॅकोची ग्रॅब्रियेला वॉलकॉटने पटकावला.एप्रिलमध्ये झालेल्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेद्वारे तिची मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी निवड झाली होती. 21 वर्षीय पार्वतीने 58 व्या मिस वर्ल्ड या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व केलं. जगभरातील सौंदर्यवतीबरोबर स्पर्धा असणा-या पार्वतीची उंची 5 फूट 9 इंच आहे. पार्वती ही मूळची केरळची आहे. पार्वती मिस वर्ल्ड 2008 स्पर्धेत दुस-या स्थानावर राहिली. या स्पर्धेसाठी जगभरातील 108 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. यापूर्वी ऐश्वर्या राय , डायना हेडन , युक्ता मुखी आणि प्रियांका चोप्रा यांनी मिस वर्ल्ड किताब पटकवला आहे.

close