मीडियाच्या दबावामुळेच सायनाला पासपोर्ट मिळाला

December 13, 2008 9:37 AM0 commentsViews: 3

13 डिसेंबर हैद्ररबादबॅडमिंटनची सुपर सीरिज खेळण्यासाठी अखेर सायना नेहवाल मलेशियाला जायला रवाना होणार आहे. भारताच्या या स्टार बॅडमिंटनपटूलाही तिच्या पासपोर्टच्या नुतनीकरणासाठी झगडावं लागलं. पासपोर्ट ऑफिसच्या लालफितीच्या कारभाराचा फटका सायनाला बसला.सायना गेले काही दिवस पासपोर्ट ऑफिसच्या खेपा घालत होती.अखेर मीडियाच्या सततच्या दबावामुळेच तिला तिचा नुतनीकरण करून पासपोर्ट मिळाला.मलेशियातल्या प्रतिष्ठेच्या बॅडमिंटन स्पर्धेतून दोन चीनच्या खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे अचानक तिची वर्णी लागली होती.पण पासपोर्टची मुदत संपलेली आणि पासपोर्ट कार्यालयाकडून होत असलेली दिरंगाईमुळे ती असहाय्य झाली होती. पण मीडियाच्या दबावामुळे पासपोर्ट कार्यालयानं आपली अब्रू झाकण्याकरिता तत्काळ पावलं उचलली. आणि तिला तिचा नुतनीकरण करून पासपोर्ट मिळाला.

close