संघ तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देतो – दिग्विजय सिंग

July 24, 2011 5:48 PM0 commentsViews: 2

24 जुलै

काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. संघ तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देतो आणि याचे पुरावे आपल्याजवळ आहेत असा दावा सिंग यांनी केला. सीएनएन-आयबीएनच्या डेव्हिल्स ऍडव्होकेट या कार्यक्रमात दिग्विजय सिंग यांनी हा दावा केला. तसेच या बद्दलची सर्व पुरावे आपल्याकडे आहे आणि ते आपण कोर्टात मांडणार आहोत असं सिंग यांनी यावेळी सांगितले.

close