पुण्यातील रस्त्यांवर आता लंडनच्या टॅक्सी धावणार

July 28, 2011 2:31 PM0 commentsViews: 3

28 जुलै

पुण्यातल्या रस्त्यांवर आता लंडनच्या टॅक्सी धावताना पहायला मिळणार आहेत. पुण्याचा पंचशील रिऍल्टी ग्रुप ही सोय उपलब्ध करुन देत आहेत. एकूण 10 टॅक्सीज पैकी 4 टॅक्सीज पुण्यात दाखल झाल्या आहेत. अत्याधुनिक यंत्रणा असणार्‍या टीएक्स 4 मॉडेल्सच्या या टॅक्सींना डिझेल इंजिन आहे. तसेच या टॅक्सीमध्ये बसण्यासाठी आरामदायी व्यवस्था आहे. हॉटेल्समधील पाहुण्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था पुरवण्यासाठी या टॅक्सींचा वापर करण्यात येणार आहे.

close