बॉलिवूड ब्लॉकबस्टर सुपरस्टार्स : रेखा

August 17, 2011 11:07 AM0 commentsViews: 18

तेलगू सिनेमात लहान मुलीची भूमिका साकरणारी मुलगी दुसरी-तिसरी कुणी नसून ती होती भानूरेखा गणेशन किंवा आज हिंदी सिनेमाच्या जगातली रेखा. जेमिनी गणेशन आणि तेलगू अभिनेत्री पुष्पपावली यांची मुलगी रेखा 10 ऑक्टोबर 1954 मध्ये तिचा जन्म. 1966 मध्ये तेलगू सिनेमा रंगुला रत्नममधून तिनं मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. तेव्हा ती होती 12 वर्षांची. आणि ही भानुरेखा अनेक शतकं रेखा म्हणून एक स्टाइल आयकॉन राहिली.

रेखा काही स्वप्न बाळगून इंडस्ट्रीत आली नव्हती. तिला यात ढकललं गेलं होतं. ती जेमिनी गणेशन या अभिनेत्याच्या कुटुंबातून आली होती . त्याने रोमॅण्टीक भूमिका गाजवल्या होत्या त्यामुळे त्यांच्या तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण ती त्यावेळी बरीच जाड होती, तेवढ्या लक्षपूर्वक ती काम करत नव्हती. त्यामुळे ज्या सिनेमांमध्ये ती होती त्या सिनेमांकडे दुर्लक्ष झालं.

रेखाचा पहिला बॉलिवूडचा सिनेमा सावन भादों. 1970मध्ये सिनेमा आला होता. त्यावेळी रेखासोबत आणखी एक नवोदित होता नवीन निश्चल. निर्माता-दिग्दर्शक मोहन सैगलनं 16 वर्षांच्या रेखाला साइन केलं. तिनं या रोमँटिक मेलोड्रामामध्ये गावातल्या मुलीची भूमिका साकारली होती.

सुरुवातीला रेखाच्या रंगावर, तिच्या दिसण्यावर बरीच टीका झाली. रेखानं आपलं वजन कमी केलं. हिंदी सुधारलं आणि तिच्यात एकदम परिवर्तनच झालं. 1976 मध्ये दो अंजानेमध्ये ती एकदम वेगळी दिसली. अमिताभ बच्चनबरोबरचा तिचा हा पहिला सिनेमा.

दो अंजाने तिच्यासाठी एक टर्निंग पॉइंट होता. तिथंच तिच्यातला बदल सुरू झाला. आणि 70-8-मध्ये रेखाकडे अनेक जण आयकॉन म्हणून पाहत होते. रेखाला प्रोफेशनल आयुष्यात भरपूर यश मिळालं आणि व्यक्तिगत आयुष्यात अनेक दु:खं तिनं पचवली. तरीही रेखा एक रहस्यच राहिली.

इतकी प्रसिद्धी मिळूनही रेखाने फार कमी मुलाखती दिल्या. ती कधी टीव्हीवर दिसली नाही. तिच्यासोबत तिची विश्वासू सेक्रेटरी अनेक वर्ष आहे. बॉलिवूडमध्ये रेखाचे खूप मित्रमैत्रिणी असूनही तिच्याबद्दलची माहिती फार कमी जणांना आहे. या वयात अनेक अभिनेते चर्चेत राहतात, दिसतात. पण रेखा फार क्वचित दिसते.

तरीही तिच्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते. म्हणूनच ती भारताची ग्रेटा गार्बो मानली जाते. रेखा कदाचित सर्वसंपन्न अभिनेत्री नसेलही, पण चंदेरी दुनियेतली ती सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री आहे हे कोणी नाकारू शकणार नाही.

close