हंसराजला अपंगांसाठी काम करायचंय

December 13, 2008 6:01 PM0 commentsViews: 5

13 डिसेंबर नाशिकदिप्ती राऊतस्विमिंग कुणासाठी छंद असतो, तर कुणासाठी स्पर्धेचं साधन. पण हंसराजसाठी ते सबकुछ आहे. औषध, आधार आणि जगण्याची आशा…सेरेब्रल पल्सी या आजारानं त्रस्त हंसराज नुकत्याच झालेल्या 9व्या नॅशनल स्विमिंग स्पर्धेमध्ये सरस ठरला. हरियाणात झालेल्या या स्पर्धेत त्यानं दोन सिल्व्हर आणि एक कास्य पदक मिळवलं.सेरेब्रल पल्सी या आजारावर हंसराजनं विजय मिळवला आहे. शरीराचे सर्व अवयव कडक करणारा हा असाध्य आजार. पण यावर मात करण्यासाठी हंसराजसाठी मदतीला आलं ते स्विमिंग. या आजारावरचा एक उपचार म्हणजे एक्वा थेरपी म्हणून हंसराजनं स्विमिंग सुरू केलं, पण आज तो इंटर-नॅशलन स्विमर बनला.हंसराजनं आतापर्यंत इंग्लंड आणि मलेशियात झालेली इंटरनॅशलन स्विमिंग चॅम्पियनशीप, ग्वाल्हेर, दिल्ली, मुंबई आणि कोलकात्याला झालेली नॅशनल गाजवली आहे. हंसराज इथेच थांबलेला नाही.आता त्याचं स्वप्न आहे ते इतर अपंगांसाठी काम करण्याचं.

close