औरंगाबादमध्ये अनियंत्रित वाहतुकीमुळे 2 जणांचा मृत्यू !

August 2, 2011 4:29 PM0 commentsViews: 3

सिटीजन्स जर्नालिस्ट निलेश मोरे, औरंगाबाद

02 ऑगस्ट

औरंगाबाद शहरात ट्रकखाली चिरडून दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले आहेत. गेल्या तीन महिन्यात शहरात दहा जणांचा अपघाती मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. त्याचे मुख्य कारण म्हणजे अनियंत्रित वाहतूक. बंदीच्या वेळेतही जड वाहने शहरात येत असल्याने या कोंडीत अधिकच भर पडतेय. शहरातील जालना रस्त्यावरील या बेबंद वाहतुकीवर प्रकाशझोत टाकलाय आमचे सिटीजन्स जर्नालिस्ट निलेश मोरे यांनी…

close