हवाई हद्दीचा भंग केल्याचा भारताकडून इन्कार

December 14, 2008 5:38 AM0 commentsViews: 3

14 डिसेंबरभारताच्या दोन लढाऊ जेट विमानांनी पाकिस्तानी हवाई हद्दीचा भंग केल्याचा आरोप पाकिस्तानानं केला आहे. लाहोर आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये शनिवारी रात्री हवाई हद्दीचा भंग झाल्याची बातमी पाकिस्तानमधल्या मीडियानं दिली आहे. पाकिस्तानी विमानाच्या प्रत्युत्तरामुळे, भारतीय जेट विमानांना मागं फिरणं भाग पडल्याचं पाकिस्तानी हवाई दलाच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. भारतीय हवाईदलानं मात्र या आरोपांचा ताबडतोब इन्कार केलाय. दहशतवादाच्या मुद्याला बगल देण्यासाठी, पाकिस्ताननं हे आरोप केल्याचं बोललं जात आहे.

close