‘सीएनजी’च्या अपुर्‍या पुरवठ्यामुळे रिक्षा चालक त्रस्त !

August 11, 2011 3:50 PM0 commentsViews: 117

सिटीजन जर्नलिस्ट सिद्दार्थ चव्हाण

11 ऑगस्ट

पुण्यात 50 हजारच्या आसपास रिक्षा आहेत. त्यापैकी जवळपास 10 हजारांवर रिक्षा सीएनजी गॅस वर चालत आहे. सीएनजीवर चालणार्‍या रिक्षांची संख्या आता वाढतेय. पण सीएनजी पंपांची अपुरी संख्या, अनियमित गॅस पुरवठा आणि 24 तास पंप सुरू नसणे यामुळे या पंपांवर रिक्षाचालकांना दररोज तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागतं आहे. यामुळे रिक्षाचालक त्रासले आहेत. सीएनजी रिक्षाचालकांच्या याच समस्यांचा वेध घेतला आमचे सिटीजन जर्नलिस्ट सिद्दार्थ चव्हाण यांनी…

close