रिपोर्ताज : आमी हाव कोली

August 12, 2011 1:33 PM0 commentsViews: 33

दोन महिन्यांच्या विश्रांती नंतर कोळी बांधवांना वेध लागतात ते नारळी पोर्णिमेचे. समुद्र किनार्‍यावर विसावलेल्या बोटींची डागडूजी करुन कोळी बांधव नारळी पोर्णिमेनंतर पुन्हा खोल समुद्रात निघणार आहेत. जसजशी नारळी पोर्णिमा जवळ येते. तसतशी कोळीवाड्यांमध्ये कामांना वेग येतो. मुंबई जवळच्या अशाच काही कोळीवाड्यांची सफर या रिपोर्ताज मध्ये…

रायगडच्या उरणमधला मोरा कोळीवाड्याचा किनारा. किनार्‍यावरच्या या छोट्या-मोठ्या बोटी, गेल्या दोन महिन्यांपासुन नांगर टाकून उभ्या राहिलेल्या. याच दिवसांमध्ये या बोटींची डागडुजी, साफसफाई, इंजिनची दुरुस्ती, रंगरंगोटीची कामं होतात. ही होतात न होतात तोच खलाशी पुन्हा एकदा समुद्रावर स्वार व्हायला तयार होतो. आपल्या बोटींवर जाळी, बर्फ, पिण्याचे पाणी, डिझेलचे बॅरेल्स, जेवणासाठी सामानसुमानाची बांधाबांध सुरु होते. दोन महिन्याची सक्तीची सुट्टी संपायला आलेली असते. खलाशी पुन्हा आपला बोजा बिस्तारा घेवून बंदराकडे रवाना होऊ लागले आहेत.

close