औरंगाबाद जिल्ह्यात सिम कार्ड विक्री बंद

December 14, 2008 7:03 AM0 commentsViews: 3

14 डिसेंबर, औरंगाबादशेखलाल शेखसिमकार्डाचा गैरवापर करण्याचे प्रकार सातत्यानं घडत आहेत. यात दुकानदारांना अडकवलं जातंय. सिमकार्ड खरेदी करणार्‍या ग्राहकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची जबाबदारी मोबाईल कंपन्या घेत नाहीत, तोपर्यंत नवे सिमकार्ड न विकण्याचा आणि जुने रिचार्ज न करण्याचा निर्णय औरंगाबाद जिल्ह्यातल्या टेलिकॉम असोसिएशनं घेतलाय.सिमकार्ड पडताळणी करण्याचं काम कंपनीचं आहे. ग्राहकाकडून कागपत्रे घेऊन ती कंपनीला पुरवणे एवढंच काम दुकानदारांचं असतं. कंपनीचा प्रतिनिधी स्वत: येऊन पडताळणी करतो. मात्र सध्या कंपनीचे प्रतिनिधी ही काळजी पुरेशा प्रमाणात घेत नाहीत. परिणामी सिमकार्ड्स दहशतवाद्यांच्या हातात जातायत आणि दोषी म्हणुन पकडले जातात ते दुकानदार. "कंपनी सांगते ते कागदपत्र घऊन ग्राहकाला सिम कार्ड विकणं, हे आमचं काम आहे. कागदपत्रांची पडताळणी करण्याचं काम कंपनीचं आहे. त्यामुळे पुढे जर काही गैरप्रकार झाले, तर ती जबाबदारी कंपनीने घ्यायला हवी" असं मोबाईलची विक्री करणारे दुकानदार शेखर गुप्ता यांनी सांगितलं. मात्र कागदपत्र देण्याच्या बाबतीत कंपनीच सवलत देत असल्याचं ग्राहकांचं म्हणणं आहे.औरंगाबाद जिल्ह्यात एका दुकानातून महिन्याला किमान दीडशे नवीन सिम कार्ड विकली जातात. तर किमान पंधरा हजारापर्यंत रिर्जाज होतात. मात्र दुकानदार आणि मोबाईल कंपन्यांच्या या वादात भरडला जातोय तो सामान्य नागरिक.

close