राळेगणसिध्दी डिजिटल करणारी अण्णांची माणसं !

August 18, 2011 11:30 AM0 commentsViews: 24

अलका धुपकर, राळेगणसिद्धी.

18 ऑगस्ट

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारेंचा उजवा हात म्हणून सुरेश पठारे यांना जसं ओळखलं जाते. तसेच अण्णांची सावली म्हणून ओळखलं जाणारं दुसरं नाव म्हणजे अनिल शर्मा. कितीही धावपळ असली तरी अण्णांचे टाईमटेबल काटेकोरपणे पाळणार्‍या आणि अण्णांचे राळेगणसिद्धी डिजिटल बनवणार्‍या अनिल शर्मा यांची ही कहाणी…

19 वर्षांपूर्वी अनिल शर्मा बीडमधून पुण्यात आले. समाजसेवेशी संबंधित छोटीमोठी नोकरी करताना अण्णांशी त्यांचा पहिला संबंध आला. तेव्हा अण्णा हे जगाचे हिरो बनले नव्हते.कि. बा. हजारे या नावाने त्याचे समाजकार्य चालू होते. कार्यालय व्यवस्थापक अनिल शर्मा म्हणतात, मी त्यांच्या पाठीला पाठ लावून मेसमध्ये बसायचो. अण्णांसोबत काम करायची संधी शर्मा यांना मिळाली ती अण्णांच्या दूरदृष्टीमुळेच. अनिल शर्मा म्हणतात, मी तेव्हा निघालो होतो पुणे सोडून पण अण्णांनीच मला थांबवले.

बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या अनिल शर्मा यांनी स्वप्न बघितलं ते अण्णांची राळेगणसिद्धी डिजिटल बनवण्याचे. आणि आता अण्णांच्या राळेगणसिद्धीमध्ये विद्यार्थ्यांसाठी भव्य डिजिटल क्लासरुम दिसतं आहे. आता यापुढे पाऊल टाकत थ्री जी सेवा सुरू करायचा प्रयत्न आहे. सुरेश पठारे आणि अनिल शर्मा ही राम लक्ष्मणाची जोडी अण्णांच्या प्रेरणेतून अखंड काम करत असते. शहरात जाऊन होणार्‍या फरफटीपेक्षा गावच्या विकासात लावलेला हातभार त्यांना मोलाचा वाटतो.

close