ग्रेट भेट : नीलिमा मिश्रा (भाग 1 )

August 18, 2011 4:51 PM0 commentsViews: 224

वयाच्या केवळ 39 व्या वर्षी नीलिमा मिश्रा यांना 'मॅगेसेस पुरस्कार' मिळाला आहे. पण जळगाव जिल्हाच्या बहादरपूर गावात त्यांनी जे काम केलं आहे त्यावरून हा पुरस्कार का देण्यात आला हे स्पष्ट होतं. तिथल्या सामाजिक, आर्थिक, परिवर्तनाचा वसाचं त्यांनी उचलला आहेत.

नीलिमा मिश्रा यांना 27 जुलै 2011 रोजी आशिया खंडातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2011 चा रॅमन मॅगेसेस पुरस्कार जाहीर झाला. घरातल्या वापरात नसलेल्या कपड्यांची गोधडी हा आपल्याकडील पारंपरिक प्रकार. याच पारंपरिक कलेला रोजगाराची जोड दिली भगिनी निवेदता बचतगटाने. त्यामुळे बहादरपूरच्या या महिला वर्षाचे बाराही महिने बिझी असतात.

बचतगटातल्या महिलांना खरं पाठबळ मिळाले ते ऑस्ट्रेलियाच्या ऍनी गॉडफ्रे यांचं. ऍनीनं या गोधडीला परदेशात मार्केट उपलब्ध करुन दिलं. आणि गेल्या 7 वर्षापासून कष्टाची ही गोधडी आता जगातील 7 देशांमधे पोहोचली. आज 1800 बचतगटांच्या हा समुहात 16 हजारच्या आसपास महिला काम करतात. अगदी 16 वर्षांपासून ते सत्तरी ओलांडलेल्या. त्यांच्या हॅण्डमेड गोधड्या दर वर्षाला एक नवा देश ओलांडत आहे.

close