अण्णांच्या गावाची सफर !

August 19, 2011 5:20 PM0 commentsViews: 207

अलका धुपकर, राळेगणसिद्धी.

19 ऑगस्ट

ग्रामविकासाचे एक आदर्श मॉडेल म्हणून अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी उभं केलं. चाळीस दारुच्या भट्‌ट्‌या असलेल्या गावात जलसंधारणाची कामं केली. एकेकाळी दारुसाठी प्रसिद्ध असणारे राळेगण अण्णांच्या कामाने प्रकाशझोतात आले.अण्णांच्या गावाची ही सफर. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पुण्यापासून 87 किलोमीटरच्या अंतरावर राळेगण परिवार आपलं स्वागत करतो. दिल्लीला जाण्याआधीचा अण्णांचा हा राळेगणचा धावता दौरा होता. राळेगणमध्ये अण्णांनी असं काय केलंय ? हे समजून घ्यायचं असेल तर अण्णांसोबतची ही धावती सफरही पुरेशी होते.

दारुच्या भट्‌ट्यांसाठी प्रसिद्ध असलेलं राळेगण पाणलोट आणि ग्रामविकासासाठीचे आदर्श गाव ठरले, स्वयंपूर्ण बनले. वाढत्या खर्चामुळे शिक्षण घेणं हे शहरातल्या गरिबांसाठी दिवास्वप्न ठरतंय. पण राळेगणमध्ये दिसतं ते हे भव्य हॉस्टेल. विद्यार्थ्यांच्या जेवणाची खास सोय इथं आहे.

आणि नापासांपासून ते कमी मार्क्स मिळवलेल्यापर्यंत हायस्कूलमध्ये प्राधान्याने दिला जाणारा प्रवेश हा सुद्धा अण्णांनी केलेला वेगळा प्रयोग आहे. नापास झालेला ठाण्याचा हा मुलगा राळेगणच्या शाळेत मात्र चांगलाच रमला आहे. अण्णांनी स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात उतरवले.आता उद्याच्या या नागरिकांनी सुजाण बनावे यासाठी ते तळमळीने लढत आहे.

close