आंदोलनासाठी गांधी टोपी हवीच !

August 21, 2011 12:52 PM0 commentsViews: 2

प्राची कुलकर्णी, पुणे

21 ऑगस्ट

नैतीकतेचं प्रतीक ते राजकारण्यांमुळे या टोपी खाली दडलंय काय असं म्हणण्या पर्यंतचा गांधी टोपीचा हा प्रवास आपण सगळ्यांनीच पाहिला. आता मात्र या गांधी टोपीचं एक नवं रुप समोर आलंय. "मी अण्णा हजारे" असं लिहिलेल्या गांधी टोपी साठी या आंदोलन करणार्‍यांना थांबावे लागत आहे. कारण गांधी टोप्यांची मागणी आता प्रचंड वाढली.

अण्णांचे आंदोलन सुरु झालं आणि या खेड्यातल्या गांधी टोपीवरची धुळ झटकली गेली. पण फरक इतकाच की या गांधी टोपीवर मी अण्णा हजारे नावाचा छाप आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे टि शर्ट आणि डोक्यावर गांधी टोपी, असं चित्र सध्या रस्त्या रस्त्यांवर पहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांमध्ये या टोप्यांची मागणी प्रचंड वाढली आहे.

तरुणांना या टोप्या घातल्याने आपण देशासाठी काहीतरी करतोय असं वाटतंय. म्हणूनच 16 ऑगस्टपासुन या दुकानात चक्क विक्री झाली 6000 टोप्यांची. गांधी टोप्यांचे विक्रेते गिरीश मुरुडकर म्हणतात, दिवसरात्र मेहनत करुन टोप्या आम्ही देतोय. सर्व तरुण-तरुणी स्वताच्या खिश्यातले पैसे देऊन या टोप्या घेत आहे. त्यासाठी आम्हाला कमीत कमी किंमतीत देण्याची कसरत करावी लागतेय. पण व्यवसायाच्या पलिकडे जाऊन आम्ही काम करतोय.

पण आता आंदोलनाची जबाबदारी अधिक वाढली आहे. ही गांधी टोपी फक्त स्टाईल स्टेटमेंट राहणार नाही याकडे आंदोलनाला लक्ष द्यावे लागेल.

close