मंदीचा विश्व मराठी साहित्य संमेलनाला फटका

December 14, 2008 8:33 AM0 commentsViews: 5

14 डिसेंबरआर्थिक मंदीचा फटका सॅनहोजे इथं होणा-या, पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनालाही बसलाय. संमेलनासाठी जाणार्‍यांची नोंदणी कमी झालीय. विश्व साहित्य संमेलनासाठी 1000 हजार पेक्षा जास्त साहित्य रसिक जाणार होते. मात्र आर्थिक मंदीमुळे आता फक्त 700 जण जातील, अशी माहिती समोर आली आहे. आर्थिक मंदीमुळे साहित्य संमेलनातल्या अनेक गोष्टींना कात्री लावली जाणार आहे.या शिवाय संमेलनासाठी मिळणार्‍या देणगीतही घट झाली आहे. भव्य दिव्य नसलं तरी विश्व साहित्य संमेलन चांगलं होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

close