योगेंद्र यादव यांची एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत

August 29, 2011 11:09 AM0 commentsViews: 61

25 ऑगस्ट

अण्णा इतक्यात माघार घेणं कठीण आहे, आणि ते उपोषण मागे घेतील अशी अपेक्षा करणंही चुकीचं आहे. कारण म्हणावं तितकं यश अण्णांच्या पदरात पडलेलं नाही असं मत राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केलंय. आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी योगेंद्र यादव यांची मुलाखत दिल्लीमध्ये घेतली, त्यावेळी ते बोलत होते. संसदेचं सर्वाेच्च स्थान अण्णांच्या टीमलाही मान्य आहे. तसंच कायदा करण्याचा अधिकार केवळ संसदेलाच असतो. पण संसदेपेक्षा जनता सर्वाेच्च असते हेही मान्य करायला हवं, असंही यादव यांनी म्हटलं आहे. ही पूर्ण मुलाखत पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा

close