आमीर खानने घेतली अण्णांची भेट

August 27, 2011 12:18 PM0 commentsViews: 4

27 ऑगस्ट

अण्णांनी आपल्या सगळ्यांना जागृत केले आहे. त्याबद्दल अण्णांचे मी आभार मानतो अण्णांच्या जनलोकपालवर संसदेत चर्चा होऊ द्यावी असं मतअभिनेता आमीर खान यांने रामलीला मैदानावर व्यक्त केलं. तसेच अण्णांना आपला पाठिंबा आहे. यावेळी सिनेमा दिग्दर्शक राजू हिरानी देखील उपस्थित होते. यावेळी आमीरने अण्णांनी उपोषण सोडावे अशी विनंती ही केली. आज जनलोकपाल विधेयकावर संसदेत आपण निवडून दिलेल्या सदस्य चर्चा करत आहे. त्यांच्यावर आपली सर्वांची नजर आहे. की ते किती भ्रष्टाचाराविरोधात मजबूत कायदा तयार करत आहे. यानंतरही भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आपल्यासर्वांना पुढाकार घ्यावा लागेल असं मतही आमीर खानने यावेळी व्यक्त केलं. तर दिग्दर्शक राजू हिरानी म्हणाले की, मी माझ्या आयुष्यात एवढे मोठे आंदोलन होईल असा विचार केला नव्हता. मी एक सिनेमा बनवला होता.लोक मला म्हणाले होते गांधींच्या रस्त्यांवर चालणे आज अवघड आहे. यावेळी गांधींजी असते तर ते असं करू शकले नसते पण गांधींच्या रूपात आपल्याला गांधी मिळाले आहे. मी अण्णांना विनंती करतो की, अण्णांनी आपले उपोषण सोडावे पण आपले आंदोलन सुरूच ठेवावे.अशी विनंती राजू हिरानी यांनी केली.

close