राहुल गांधींचे टायमिंग चुकले – योगेंद्र यादव

August 26, 2011 5:07 PM0 commentsViews: 2

26 ऑगस्ट

काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज संसदेत अण्णांच्या आंदोलनावर विधान करून टीकाला सामोर जावे लागले आहे. राहुल गांधी यांनी आजच्या घडीला असं विधान करण्यास योग्य वेळ नव्हती असं मत राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केलं तसेच कोणत्या आंदोलनाची क्रांती ही एसी रुममध्ये होत नसते ती अशाच आंदोलनातून होत असते असा टोला ही लगावला. त्याचबरोबर भ्रष्टाचाराविरोधात सर्व देशाला आवाज उठवण्यात अण्णांच्या आंदोलनाला यश आलं आहे. आता प्रभावी लोकपाल आणल्याशिवाय सरकार किंवा विरोधी पक्षांकडे पर्याय नाही. आंदोलनाचा विजय झालाय, त्यामुळे अण्णांनी उपोषण मागे घ्यावे असं आवाहन राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केला.

close