पुण्यात सुरेश आलूरकर यांची हत्त्या

December 14, 2008 9:06 AM0 commentsViews: 4

14 डिसेंबर, पुणेपुण्यातील अलूरकर म्युजिक वर्ल्डचे मालक सुरेश अलूरकर यांचा चाकूनं भोसकून हत्या करण्यात आलीय. कर्वे रोडवरील स्वप्ननगरी हाऊसिंग सोसायटीतील फ्लॅटमध्ये अलूरकर यांचा खून झाला. दुकान न उघडल्यानं त्यांचे मित्र अलूरकरांच्या घरी गेले. तेव्हा अलूरकर यांचे हात पाय वायरनं बांधून त्यांचा चाकूनं भोसकून खून करण्यात आल्याचं लक्षात आलं. ही माहिती डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जंयवत देशमूख यांनी दिली. 59 वर्षांच्या अलूरकरांच्या मागं पत्नी अनुराधा आणि 2 मुलं असा परिवार आहे. अलूरकर गेली 10 वर्ष एकटेच राहत होते. पु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाच्या ऑडीओ कॅसेट्स तसंच जून्या दुर्मिळ मराठी गाण्यांच्या कॅसेट्स मिळण्याचं हमखास ठिकाण म्हणजे अलूरकर 'म्युझिक वर्ल्ड' असा लौकिक होता.

close