लालबागच्या राजाचं मुखदर्शन

September 1, 2011 3:35 PM0 commentsViews: 67

29 ऑगस्ट

गणरायचं आगमनसाठी अख्खा महाराष्ट्र आता सज्ज झाला आहे. दोन दिवसांनी महाराष्ट्राचा विघ्नहर्ता घरात दाखल होणार आहे. आज लालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन करण्यात आलं. लालबागचा राजा देश-विदेशातील असंख्य भक्तांचे श्रध्दास्थान बनले आहे. नवसाला पावणारा राजा अशी ख्याती दूरवर पसरली आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लाखोभक्त दरवर्षी गर्दी करत असतात. लोभस असं रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी भक्तांची ओढ लालबागच्या दिशेने लागते. आयबीएन लोकमतने सर्वात प्रथम 'लालबागच्या राजाचं' पहिले मुखदर्शन सर्व भक्तांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे.

close