पंतप्रधानांचा पाकला इशारा

December 14, 2008 9:22 AM0 commentsViews: 3

14 डिसेंबरजोपर्यंत पाकिस्तान, त्यांच्या भूमिचा वापर दहशतवादासाठी थांबवत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानबरोबरचे संबंध पूर्ववत होऊ शकणार नाही, असं पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी स्पष्ट केलंय. ते बारामुल्लामध्ये बोलत होते. तसंच काश्मीरचा प्रश्न शांततेच्या मार्गानं सोडवला जाऊ शकतो असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. "पाकिस्तानमधील काही लोक आजही दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. आम्हला शांतता हवी आहे पण आमच्या सदिच्छेला आमची कमजोरी समजू नये" असं ते म्हणाले.मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची पाळंमुळं पाकिस्तानात असल्याचं आता स्पष्ट झालंय. पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी भारतानं वारंवार केली आहे. 26/11 नंतर पाकिस्तानवरचा आंतरराष्ट्रीय दबाव वाढत चाललाय. मात्र पाकिस्तानकडून त्याला फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाहीये. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.

close