”बाप्पांच्या विसर्जनानंतर रेल्वे आम्हाला घरी नेणार काय ?"

September 2, 2011 10:44 AM0 commentsViews: 2

02 सप्टेंबर

गणपती बाप्पांचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे कोकणाची चाकरमान्यांनी वाट धरली. मात्र मुसळधार पावसाने रेल्वे सेवेचे तीनतेरा वाजले. पोंमेडी येथे सरक्षण भींत पुन्हा एकदा कोसळली आहे. रेल्वे ट्रकवर माती आणि चिखल साचला आहे. गेल्या 4 तासापासून कोकण रेल्वे ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला आहे. रत्नागिरी स्टेशनवर दादर सावंतवाडी गाडीतील प्रवाशांनी स्टेशन मास्तरला घेराव घालून आपला संताप व्यक्त केला. या संतप्त प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहे आमचे ब्युरो चीफ दिनेश केळुस्कर यांनी…

close