26/11 मागे लष्कर-ए- तोयबा – गॉर्डन ब्राऊन

December 14, 2008 9:51 AM0 commentsViews: 1

14 डिसेंबर, दिल्ली "मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामध्ये लष्क-ए-तोयबाचा हात असल्याचे स्पष्ट पुरावे मिळाले आहेत. पाकिस्तानने त्यावर कारवाई करायला हवी" असं इंग्लंडचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान मनमोहन यांची त्यांनी रविवारी सकाळी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा असल्याचा दावा भारतानं वारंवार केला होता. तो मान्य करत भारताच्या भूमिकेला ब्राऊन यांनी समर्थन दिले. 26/11 मधील आरोपींची चौकशी करायचा भारत आणि पाकिस्तान दोघांनाही अधिकार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. "भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश शांततेच्या मार्गानं या समस्येवर उत्तर शोधतील" असा विश्‍वास ब्राऊन यांनी व्यक्त केला.भारताच्या भावना पाकिस्तानपर्यंत पोहचवू असं आश्वासन त्यांनी दिलं. यानंतर ते पाकिस्तानला रवाना झाले. पाकिस्तानचे पंतप्रधान आसिफ अली झरदारी यांची ते भेट घेणार आहे.

close