पाण्याखालील जीवसृष्टीचा नयरम्य देखावा

September 4, 2011 8:58 AM0 commentsViews: 5

04 सप्टेंबर

जमिनीवरच्या प्रदूषणाबाबत जेवढ बोललं जातं, तेवढी पाण्यातल्या, समुद्रातल्या प्रदूषणाबद्दल मात्र चर्चा होत नाही . त्यामुळे समुद्रातील जीवनही सुंदर असतं. ते प्रदूषणमुक्त राहावे यासाठी प्रयत्न करावेत ही थीम घेऊन डोंबिवलीतील एकता गणेशोत्सव मंडळाने पर्यावरण रक्षणावर आधारित देखावा सादर केला. पाण्याखालील जीवांचं मनोहर जीवन या देखाव्याचा माध्यमतून दाखवण्याचा प्रयत्न या मंडळाने केला. समुद्री पर्यावरण जपायलाच हवं असा संदेश या थीममधून देण्यात आला. एकता मंडळाची गणपतीची मूर्तीही इकोफ्रेंडली असून संपूर्ण सजावट कागदापासून करण्यात आली आहे.

close