फिनलँडमध्ये गौरी गणपतीचे आगमन

September 6, 2011 5:20 PM0 commentsViews: 69

06 सप्टेंबर

फिनलँडमध्येही गौरी गणपतीचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाचे यंदाचे हे सहावे वर्ष आहे. फिनलँडमध्ये स्थायिक असलेल्या हेरंब कुलकर्णी यांच्या पुढाकाराने हा गणेशोत्सव आयोजित करण्यात आला आहे. फिनलँडमधील तामतेरे शहरात आयोजित या गणेशोत्सवात फिनलँडमधिल तमाम गणेश भक्तांनी गर्दी केली होती. सुपारीचा गणपती हे या गणेशोत्सवाचं वैशिष्ट आहे. इकोफ्रेंडली गणेशोत्सवाचा पुढाकार करण्यासाठी हा सुपारी गणपती दरवर्षी बसवण्यात येतो अशी माहीती हेरंब कुलकर्णी यांनी दिली.

close