चेन्नई टेस्टमध्ये भारतासमोर 387 रन्सचं आव्हान

December 14, 2008 10:52 AM0 commentsViews: 2

14 डिसेंबर, चेन्नई चेन्नई टेस्टमध्ये इंग्लंडने विजयासाठी 387 रन्सचं आव्हान दिलं आहे. या आव्हानाचा सामना करताना सेहवाग आणि गंभीर यांनी भारतालाही दणकेबाज सुरुवात करुन दिली आहे. सेहवागने 32 बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी केलीय. त्यापूर्वी, अँड्र्यू स्ट्रॉस आणि पॉल कॉलिंगवूड यांची सेंच्युरी हे इंग्लंडच्या इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 214 रन्सची पार्टनरशिप केली. पण सेंच्युरी पूर्ण झाल्यावर दोघेही झटपट आऊट झाले. त्यानंतर मॅट प्रायरचा अपवाद वगळता इतर इंग्लिश बॅट्समन भराभर आऊट झाले..आणि कॅप्टन केविन पीटरसनने नऊ विकेटवर 311 रन्सच्या स्कोअरवर इनिंग घोषित केली. भारतातर्फे अमित मिश्रा आणि हरभजन सिंगने प्रत्येकी तीन तर झही खानने दोन विकेट्स घेतल्या.

close