मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

December 14, 2008 11:42 AM0 commentsViews: 2

14 डिसेंबर नागपूर15 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. पण राजकीय आरोप-प्रत्यरोपांना आत्तापासूनच सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं चहापानाचा कार्यक्रम आयोजित करायला नको होता असं विरोधी पक्षांच म्हणणं आहे. या अधिवेशनात मुंबई हल्ल्यासंबधी स्थगन प्रस्ताव आणणार असल्याचंही विरोधी पक्षांच म्हणणं आहे.मुंबईवरील हल्ल्यामुळे राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार जनतेच्या संपत्तीच तसंच सर्वसामान्य माणसांच कोणत्याही प्रकारे संरक्षण करू शकत नाही. राज्याच्या सुरक्षेकरिता हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. म्हणून सरकारला मुंबई हल्ल्याचा जाब या अधिवेशनात विचारला जाणार आहे असं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलं. हल्ल्यानंतर विलासराव देशमुख, आर.आर.पाटील यांनी राजीनामा दिला पण कोणत्याही पोलीस अधिका-यांनी राजीनामा दिला नाही याविषयी सरकारकडून उत्तराची अपेक्षा आहे.विरोधकांचा हा पवित्रा पाहता हे अधिवेशन लवकरात लवकर गुंडाळण्याचा सरकार प्रयत्न करील, असंही विरोधकांना वाटतं.

close