कोल्हापुरात रंगली बैलांच्या शर्यतीची स्पर्धा

September 12, 2011 2:26 PM0 commentsViews: 70

12 सप्टेंबर

शेतीची कामं झाल्यानंतर बळीराजा थोडासा आपल्या विरंगुळ्याकडे वळतो. आणि याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात बैलांच्या आणि रेड्यांच्या चिखलगुठ्ठा स्पर्धा होतात. शाहूवाडी तालुक्यातील ससेगाव इथं या स्पर्धा होतात. शेतीची कामं संपल्यावर बैल आणि रेड्यांच्या जोड्या घरी बसून असतात. त्यांना कामाची सवय राहावी आणि शेतकर्‍यांना विरंगुळा मिळावा हा या स्पर्धांमागचा हेतू आहे. यामध्ये सामील होणार्‍या बैल जोड्यांच्या किंमतीही लाख रुपयांच्या घरात असतात.

close