लालबागच्या राजाला निरोप

September 12, 2011 7:32 AM0 commentsViews: 124

12 सप्टेंबर

अरबी समुद्रात ठाकलेला लालबागचा राजा…त्याला नाखवांच्या होड्यांची सलामी…किनार्‍यावर लाखो भक्तगण निरोपाचे अश्रू घेऊन उभे हे दृश्य होतं आज गिरगावच्या किनार्‍यावरचं. लालबागच्या राजाचं आज सकाळी गिरगावातं थाटात विसर्जन झालं. तब्बल 22 तास राजाची विसर्जन मिरवणूक चालली. सुरुवातीपासूनच भक्तांनी जागोजागी पुष्पवृष्टी आणि हार घालून राजाला वंदन केलं. पहाटे साडेपाचच्या सुमारास राजा चौपाटीवर आला. तिथं पूजा आणि आरती होऊन मग कोळी बांधवांनी मानानं राजाला खास तराफ्यावर बसवलं. हा तराफा होड्यांना बांधून खोल समुद्रात नेण्यात आला. तिथं मग कोळी बांधवांनी सन्मानानं आणि बाप्पा मोरयाच्या गजरात राजाचं विसर्जन केलं.

close