..तर आंदोलन सोडेन – अण्णा

September 13, 2011 3:28 PM0 commentsViews: 10

13 सप्टेंबर

'जनलोकपाल'च्या आंदोलनात जर भ्रष्टाचार करणारे व्यक्ती सहभागी असतील तर मी हे आंदोलन सोडून देईन अशा इशारा अण्णा हजारे यांनी दिला. तसेच अण्णांनी आपल्या आंदोलनात सहभागी असलेल्या सदस्यांना आणि इंडिया अगेनस्ट करप्शन या संस्थेला ऑटिड रिपोर्ट सादर करा आणि आंदोलनावर जो खर्च झाला आहे तो जाहीर करा अशी सुचनाही अण्णांनी आपल्या टीमला दिली आहे. दिल्लीवर झालेल्या आंदोलनानंतर अण्णांनी सर्वप्रथम आयबीएन लोकमतला मुलाखत दिली. या मुलाखतीत अण्णांनी हा सुचनावजा इशारा दिला.

जनलोकपाल विधेयकासाठी अण्णांनी पुकारलेल्या दुसर्‍या लढ्याला ऐतिहासिक विजय मिळला. अण्णांनी हा विजय तमाम् जनतेच्या वाहीला. हा विजय जनतेचा आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या तरूणांचा आहे असं मत अण्णांनी व्यक्त केलं. दिल्लीवर 12 दिवस उपोषण केल्यानंतर अण्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर आपल्या गावी राळेगणसिध्दीला आहे. राळेगणमध्ये झाले सत्कारनंतर अण्णांनी आज माध्यमांशी बातचीत केली. आंदोलन सुरू होण्याअगोदर आणि आज आंदोलनाच्या विजयानंतर अण्णांनी आपलं मत व्यक्त करण्यासाठी पहिला मान आयबीएन लोकमतला दिला. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी अण्णांची मुलाखत घेतली.

12 दिवस उपोषण केल्यामुळे अण्णांना अशक्तपणा आला होता. उपोषण सोडल्यानंतर अण्णांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज अण्णांना प्रकृतीबद्दल विचारले असता अण्णा म्हणाले की, आता माझी तब्येत ठिक आहे. आणि आपण लवकरचं जनलोकपाल विधेयक आणि निवडणूक प्रक्रिया सुधारण्यासाठी देशभरात जनजागृती यात्रेचे नियोजन केले आहे. आणि पुढिल महिण्यात या देशव्यापी दौर्‍याला आपण सुरूवात करणार आहोत. अशी घोषणा अण्णांनी यावेळी केली. तसेच वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधील पुढार्‍यांनी आणि नेत्यांनी पुढे येऊन समाजाच्या विकासाचा विचार केला पाहिजे आणि यासाठी नेत्यांनी वेगळा पक्ष स्थापन करावा अशा पक्षाला आपला पाठिंबा असेलच आणि वाटलं तर यापक्षांचा मी प्रचारही करेन अशी ग्वाहीही अण्णांनी दिली.

अण्णा राळेगणमध्ये आल्यानंतर सरकारने अण्णांना झेड सिक्युरिटी देण्याचा आग्रह धरला. त्यासाठी काही जवानही अण्णांच्या सुरक्षेसाठी राळेगणमध्ये तैनात करण्यात आले आहे. मात्र अण्णांनी ही सुरक्षा आपल्याला जनतेशी भेटू न देण्याचा घाट आहे. या सुरक्षेमुळे जनतेशी संवाद साधताना अडथळा येतो. या सुरक्षेच्या माध्यमातून माझ्यावर पाळत ठेवण्याच घाट असण्याची शक्यता आहे असा संशय अण्णांनी केला. आजपर्यंत कित्येक दौर्‍यांवर गेलो पण कधीच सिक्युरिटी वापरली नाही. माझ्यापेक्षा सरकारलाचं जास्त भीती वाटत आहे. असं मत अण्णांनी व्यक्त केलं.

भ्रष्टाचारविरोधात पुकारलेल्या आंदोलन पारदर्शक करण्यासाठी अण्णांनी आपल्या टीमपासून सुरूवात केली. इंडिया अगेन्सट करप्शन या संस्थेत असणार्‍या तीन ट्रस्टींची माहिती सादर करा आणि आणखी चार स्वच्छ चारित्र्याच्या ट्रस्टींना संस्थेचं ट्रस्ट्रीचं सदस्य करून घ्या. जेव्हापासून आंदोलनाला सुरूवात केली आहे. तेव्हापासून ते आजपर्यंत आंदोलनाचा सर्व खर्चाचे ऑडिट करा आणि तो जाहीर करा असा सल्लावजा सुचना अण्णांनी टीमला दिल्या आणि जर आपल्या आंदोलनात भ्रष्टाचाराचा पैशा असेल तर हे आंदोलन मी सोडून देईल असा इशाराही अण्णांनी यावेळी दिला.

close