पेन्टिंगनी रत्नाला दिली नवसंजीवनी

December 14, 2008 9:59 AM0 commentsViews: 15

14 डिसेंबर चंद्रपूरनम्रता शास्त्रकार अपंगत्व हे जर जन्मत:च असेल तर त्याचं जास्त दुःख वाटत नाही. पण जर ते अचानक ओढवलं तर माणूस पुरता खचून जातो. जीवनात अंधाराशिवाय काहीच दिसत नाही. पण शरीराला आलेलं अपंगत्व मनाला न लागू देता त्यातून मार्ग काढला तर काहीही अशक्य नाही. आणि असाच काहीसा मार्ग काढलायं चंद्रपूरच्या रत्ना सरकारनं. चंद्रपूरच्या मुक्ती कॉलनीत राहणारी रत्ना. रत्ना जन्मत: अपंग नाही. तर नशिबानं तिच्यावर अपंगत्व लादलंय. 3 डिसेंबर 1996 ला नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना रेल्वे रुळावर अचानक तिचा अपघात झाला. आणि त्यात तिला आपले हात गमवावे लागले. रत्ना सांगते,अशावेळी माणूस खचून जातो. त्यावेळी फक्त दोन गोष्टी होतात माणूस पूर्णपणे संपतो किंवा जीवनात नवीन मार्ग शोधतो. अशा परिस्थितीत रत्नानं दहावीची परीक्षा दिली आणि पासही झाली. रत्नानं मनाशी निर्धार करत स्वत:ला सावरलं. बचावलेल्या एका बोटानं तिनं पेटिंग करायला सुरुवात केली. आज ती सुरेख पेंटिंग तर करतेच.शिवाय इतरांना शिकवते देखील. काळानं केलेला आघात रत्नानं सहन केलाच. तसंच खचून न जाता तिनं आपल्या कलागुणांचाही विकास केला.

close