राणेंची नार्को टेस्ट करा- रामदास कदम

December 14, 2008 12:53 PM0 commentsViews: 58

14 डिसेंबरअतिरेक्यांचे राजकीय संबध राणेंना माहित असतील तर राणेंची नार्को टेस्ट करा, अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे. मुख्यमंत्रीपदी राणेंची नेमणूक झाली नाही. त्यावेळी नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही राजकीय नेत्यांचे अतिरेक्यांशी संबंध आहेत असं जाहीर केलं होतं. या अधिवेशनात नारायण राणे यांनी अतिरेक्यांशी राजकीय लोकांशी असलेले संबधांसंदर्भात केलेल्या आरोपावरून वातावरण तापणार आहे. नारायण राणे यांनी अतिरेकी आणि राजकारण्यांचे लागेबांधे असल्याचा आरोप केला. त्यावर रामदास कदम यांनी राणेंकडून ही माहिती काढण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी केली आहे. हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर त्यांनी पत्रकार परिषदेत अशी मागणी केली.

close