टाकाऊ वस्तूपासून बनविलेल्या वस्तूंच विक्रोळीत प्रदर्शन

December 14, 2008 9:37 AM0 commentsViews: 189

14 डिसेंबर मुंबईगोविंद तुपे मुंबईतल्या विक्रोळीतील माध्यमिक विद्यालयात एक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात टाकाऊ वस्तूपासून बनवलेल्या टिकाऊ वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. इथल्या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या या वस्तू माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आहेत.घरातील जळालेल्या माचिसच्या काड्यापासूनही या मुलांनी आकर्षक प्राण्यांची प्रतिकृतीही बनवली आहे. थर्माकोलपासून बनविलेल्या वस्तूही याठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. घरातील टाकाऊ वस्तूपासून बनविलेल्या या वस्तूंची याप्रदर्शनात विक्री केली जात आहे. आणि या प्रदर्शनाच्या विक्रीपासून मिळणारा पैसा आतिरेक्यांच्या हल्ल्यात जे जवान शहिद झालेत त्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून दिली जाणार आहे.

close