डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतलेले क्षणचित्र !

October 6, 2011 5:52 PM0 commentsViews: 174

06 ऑक्टोबर

दसर्‍याबरोबरच आज आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन. 1956 साली आजच्याच दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. नागपूरच्या दीक्षाभूमीवर हा कार्यक्रम झाला होता. तेव्हापासून दरवर्षी दीक्षाभूमीवर हा दिवस साजरा होतो. महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र या पुस्तकात या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा प्रसंग लिहिला आहे. या पुस्तकात त्या घटनेचे साक्षीदार राहिलेले फोटोग्राफ्स आपल्याला पहायला मिळतात.

धम्मचक्र प्रवर्तनाचा कार्यक्रम वॅक्सिन इन्स्टिट्यूटजवळच्या खुल्या मैदानात दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. जमिनीवर बांबूच्या चटया आणि मैदानात 3000 इलेक्ट्रिक दिवे लावण्यात आले होते. या मैदानाला दीक्षाभूमी हे नाव देण्यात आलं. 6 लाख लोकांनी मैदानात गर्दी केली होती. नागपूर आणि मुंबईच्या समता सैनिक दलाकडे या कार्यक्रमाची व्यवस्था होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी महास्थवीर भिक्खू चंद्रमणी यांच्यासोबत सकाळी साडेनऊ वाजता आले. बाबासाहेब आणि त्यांच्या पत्नी माईसाहेब म्हणजेच डॉ.शारदा आंबेडकर हे दोघेही बुद्धाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभे राहिले आणि महास्थवीर भिक्खू चंद्रमणी यांनी त्रिशरण आणि पंचशील यांचा पाठ करून दोघांनाही बौद्ध धर्माची दीक्षा दिली. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या जनसमुदायालाही सामूहिक दीक्षा देण्यात आली. पुढे याच दीक्षाभूमीवर एक अप्रतिम स्मारक बांधण्यात आलं.

close