…आणि कार्यक्रमातच मुख्यमंत्र्यांच्या डुलक्या !

October 7, 2011 2:48 PM0 commentsViews: 7

07 ऑक्टोबर

आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी या दीड तासाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री जवळपास 25 ते 30 मिनिटे स्टेजवर चक्क झोपुन होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा काँग्रेस कमिटीनं केलं होतं. या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी मुख्यमंत्री झोपत असल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा कार्यकर्त्यांची चलबिचल सुरू झाली. कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याच्या कानातही वारंवार सांगत होते. पण चक्क सकाळी दहा वाजताच्या कार्यक्रमातच मुख्यमंत्र्यांनी डुलक्या मारल्या.

close