गोव्याला विळखा खाणींचा

October 13, 2011 3:21 PM0 commentsViews: 15

शहा आयोगाने गोव्याच्या खाण कारभाराची चौकशी सुरू केली आणि सार्‍या देशाचं लक्ष गोव्याकडे वेधलं गेलं. तब्बल 8 हजार कोटींचं अवैध उत्खननाचा ठपका ठेवण्यात आला. गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी तर आपण दोषी असलो तर राजीनामा देऊ स्पष्ट करून टाकलं. राजकारणाच्या पटावर चित पट आणि मारामारी तर होईलच पण या घोटाळ्यामुळे गोव्याच्या ग्रामीण भागाची दुर्दशेची झाली. गोव्याच्या शिरगाव गावात आता नागलकुड्याच्या फुलांऐवजी खाणीच दिसतात..खोल खोल जाणा-या..पाण्याचा थेंब थेंब शोषून घेणा-या.. पाणी नाही म्हणून याच गावातल्या सुरेश गावकरांना शेती सोडावी लागलीय.दुसरीकडे मजूरी करून त्यांना संसाराचा गाडा चालवावा लागतोय. " 25 वर्षांपूर्वी ही परिस्थिती नव्हती. गेल्या दहा वर्षात जे काही झालं ना.! .विहिरी कोरड्या पडल्या..शेतीला पाणी नाही ..पाणीच नाही तर शेती कशी करणार..? असा प्रश्न स्थानिक शेतकरी विचार आहेत. गावातल्या अशा 75 विहिरी कोरड्या आहेत. पावसाळ्यात सुध्दा इथे पाणी नसतं. खाणी पोना-पोना म्हणजेच खोल -खोल गेल्यामुळे विहिरींना येणारे झरे खाणींना जाऊन मिळाले आहे. यावरच आधारीत हा रिपोर्ताज….रिपोर्ताज पाहण्यासाठी शेजारच्या व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा.

close