आकाश कंदीलावर अण्णांची छाप !

October 14, 2011 2:46 PM0 commentsViews: 26

14 ऑक्टोबर

दिवाळी म्हटलं की आकाश कंदील आलेच,आणि सध्या पुण्यातल्या हात कागद संस्थेने आकाश कंदीलांचं प्रदर्शन भरवलं आहे. महत्वाचे म्हणजे दिवाळीतही अण्णांची क्रेज कायम आहे. अण्णांच्या आंदोलनात गाजलेल्या, गांधी टोपीच्या आकाराच्या आकाश कंदील सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तसेच या प्रदर्शनात वेगवेगळ्या आकाराचे कंदील ठेवण्यात आले आहेत. हे सगळे कंदील पुण्यातील आर्ट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनेतून साकारले आहेत. हाताने तयार केलेल कागदी कंदील इको फ्रेंडली तसेच टिकाऊ असतात. त्यामुळे हा दिवाळी सण इको फ्रेंडली पद्धतीने साजरी करण्याचा संदेश या प्रदर्शानातून देण्यात येतोय.

close