बॉक्सिंग वर्ल्डकपमध्ये भारतीय दिग्गज पराभूत

December 14, 2008 1:57 PM0 commentsViews: 2

14 डिसेंबर मॉस्कोरशियात मॉस्को इथं सुरु असलेल्या बॉक्सिंग वर्ल्डकपमध्ये भारताच्या तीन बॉक्सर्सना सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. 51 किलो वजनी गटात भारताच्या जीतेंदरकुमारचा क्युबाच्या हर्नांडेझ लफितानं पराभव केला. मॅचच्या सुरवातीपासूनच लफितानं आक्रमक पवित्रा घेत जीतेंदरकुमारवर आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवत अखेर लफितानं 14 विरुध्द 6 अशा फरकानं ही मॅच जिंकली. 54 किलो वजनी गटात अखिलकुमारलाही पराभवचा धक्का बसला.क्युबाच्याच यान्कील अलारकॉननं त्याचा पराभव केला. चौथ्या राऊण्डनंतर दोघांच्याही खात्यात प्रत्येकी चार पॉईंटसची नोंद झाली होती. पण चांगल्या खेळाच्या आधारावर रेफ्रीने अलारकॉनला विजयी घोषित केलं. दुसरीकडे भारताच्या लाकराचाही 57 किलो वजनी गटात पराभव झाला. क्यूबाच्या लोरिएंटनं त्याच्यावर मात केली. या पराभवामुळे जीतेंदर कुमार,अखिलकुमार आणि लाकराला ब्राँझमेडलवर समाधान मानावं लागलं.

close