अजितदादांना टगेगिरीला भोवली – उध्दव ठाकरे

October 17, 2011 1:39 PM0 commentsViews: 9

17 ऑक्टोबर

खडकवासला झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या पराभवावर शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी टीका केली. टगेगिरी, टरेगिरीला सर्वसामान्य माणसाने चिरडून टाकले आहे असा खणखणीत टोला उध्दव ठाकरे यांनी अजितदादांना लगावला आहे. तसेच पोटनिवणूकीत सहानुभूतीची लाट असते मात्र अजितदादांनी पक्ष फोडला, पैसा उभा केला साम,दाम, दंडभेद नीती अवलंबवली होती म्हणून जनतेनं त्यांचा पराभव केला अशी टीकाही उध्दव ठाकरे यांनी केली.

close