दान आयुष्याचं

October 25, 2011 1:18 PM0 commentsViews: 137

मानवी आयुष्य हे मोठं गुंतागुंतीचं असतं. पण मानवी आयुष्य समृद्ध करण्याची क्षमताही आपल्यात असते. अवयव दान हा मानवी आयुष्याचा असाच एक पैलू ज्याने मानवी आयुष्य समृद्ध होतं. हे देणं आहे मानवतेचं. 1994 च्या ऑर्गन ट्रान्सप्लाँट ऍक्टमुळे हे देणं आता सुरक्षित झालंय.

नेत्रशल्यचिकित्स म्हणून वैद्यकीय क्षेत्रात स्वत:च्या कामाची मोहर उठवलेलं एक वजनदार नाव म्हणजे डॉक्टर तात्याराव लहाने. पण डॉक्टर लहाने हे स्वत:च जेव्हा पेशंट होते तो काळ मोठा कठीण होता. पद्मश्री पुरस्कारापासून ते लाखो पेशंटनी दिलेल्या दुव्यानंतर आज त्यांची किर्ती सर्वदूर पसरलीय. पण 17 वर्षांपूर्वी डायलिसिसचे हाल ते सहन करत होते.

खालावलेली प्रकृती आणि डायलिससच्या त्रासातून डॉक्टर लहाने यांना वाचवू शकलं ते किडनीदान. ब्रेन डेथ झालेली व्यक्ती जसं मरणोत्तर किडनीदान करु शकते, तसंचं माणसांना जिवंतपणीही किडनीचं दान देता येतं. डॉ. लहाने यांना त्यांच्या मायने म्हणजे अंजनाबाईंनी किडनीदान दिलं.

तात्यारावांना किडनी द्यायला आई तयार होती पण अनेक पेशंट्सना नातलगांच्या किडनीही मॅच होत नाहीत किंवा काहीवेळा नातलग दानासाठी तयारही नसतात. अशा हजारो पेशंट्साठी कॅडेव्हर दाते महत्वाचे असतात. नवनीत पब्लिकेशनचे प्रमुख जितेंद्र गाला हे एक यशस्वी आणि बिझी बिझनेसमन. अचानक निकामी झालेल्या किडनीमुळे त्याचं रुटीन बिघडलं होतं. डायलिसिसही त्यांना फार काळ साथ देऊ शकत नव्हतं.

पण जितेंद्र गाला यांनी हिंदूजा हॉस्पिटलमध्ये केलेल्या नोंदणीनंतर वेटींग लिस्टवर किडनीचं दान मिळालं. दात्यासोबत त्यांचं रक्ताचं नातं नव्हतं. पण अवयवदानाच्या या नव्या नात्याबद्दल जितेंद्र गाला नेहमीच कृतज्ञ आहेत.

दान आयुष्याचं…हा रिपोर्ताज पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा

close