गझनीच चाललंय जोरदार मार्केटिंग

December 14, 2008 4:04 PM0 commentsViews: 3

14 डिसेंबर मुंबईकाही दिवसांनी आमीरचा गझनी येतोय .गझनीसाठी आमीरनं केलेल्या वर्कआऊटचंही जोरदार मार्केटिंग सुरू आहे. गजनी रिलीज व्हायला आता फक्त 10 दिवस राहिले आहेत. त्यामुळे सिनेमाची पब्लिसिटी जोरात सुरू झाली आहे. एवढंच नाही पब्लिसिटीसाठी वेगवेगळया आयडियाही लढवल्या जात आहेत.सिनेमा रिलीज व्हायच्या आधी आमीर खानने एक व्हिडीयो रिलीज केलाय. परफेक्ट आमिर खानने गजनीसाठी आपला लूक तर बदलला, सोबत तगडी बॉडी सुध्दा बनवली. आता आमिरच्या या नव्या लूकचं मार्केटिंगही जोरात सुरू आहे. या नव्या लूकसाठी आपण कशी मेहनत घेतली याचा एक व्हिडीयोच आमिरनं रिलीज केला आहे. आमीरला फिट बनवण्यात आमीरबरोबरच त्याचा ट्रेनर सत्यजित चौरासियाचीही तेवढीच मेहनतआहे.

close