आशाताईंच्या भेटीला राज ठाकरे

October 25, 2011 3:21 PM0 commentsViews: 13

25 ऑक्टोबर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची भेट घेतली. आशा भोसले यांचं नाव नुकतंच गिनिज बुकमध्ये नोंदवलं गेलं आहे. स्टुडिओमध्ये सर्वांत जास्त गाणी गाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी राज यांनी आशा भोसले यांची भेट घेतली. गिनिज बुकमध्ये नाव गेल्यानंतर अनेकांनी फोन करून शुभेच्छा दिल्या. पण प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणारे राज ठाकरे हे पहिलेच आहेत,असं आशाताईंनी यावेळेस सांगितलं.

close