अखेर ‘फॉर्म्युला’ सुपरहिट !

October 31, 2011 12:58 PM0 commentsViews: 3

31 ऑक्टोबर

पहिली वहिली भारतीय ग्रांप्रि अखेर यशस्वी ठरली आहेत. नेटक्या आयोजनामुळे फॉर्म्युला वन फॅन्स आणि जगभरातून आलेल्या स्टार्सनीही स्पर्धा उचलून धरली. त्यामुळे फॉर्म्युला वन हंगामात इंडियन ग्रांप्रिचं स्थान आता पक्कं झालंय असं म्हणायला हरकत नाही.

नोयडा येथील बुध्दा सर्किट हा फॉर्म्युला वनचा नवीन ट्रॅक. पण या हंगामातली हेडलाईन कायम राहिली. 24 वर्षांचा सॅबेस्टिअन व्हेटलने हंगामातील आपली अकरावी रेस जिंकली. पोडिअमवर व्हेटलचा विजयी जल्लोष सुरु होता तेव्हाच आयोजकही समाधानाने न्हावून निघाले होते. बुद्धा इंटरनॅशनल सर्किटची जमलेल्या प्रत्येकानेच तारीफ केली.

फॉर्म्युला वन ही जसी वेगाशी स्पर्धा आहे. तसेच ग्लॅमरलाही इथं खास स्थान आहे. त्यामुळे स्टार्सची गर्दी इथंही पहायला मिळाली. दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ माल्या अर्थातच फोर्सवनला चिअर करत होते. पण मास्टरब्लास्टर सचिन आणि सुपर स्टार शाहरुख खानही इथं होते. सचिनच्या हस्ते फ्लॅग ऑफही झाला.

सचिनने नंतर स्टार ड्रायव्हर मायकेल शुमाकरबरोबर फोटोही काढला. इतर क्रिकेटर्सही तिथं होते. खासकरुन सेहवाग आणि करुण चांडोक बरोबर होते. फॉर्म्युला वन स्टारसाठीही भारतीय ग्राँप्रिचा अनुभव नवा होता. आणि भारतात घालवलेला एक आठवडा त्यांच्यासाठीही सुखद आठवणींचा ठरला. रेसनंतर झालेल्या परेडमध्ये सगळ्यांचे उजळलेले चेहरे हेच सांगत होते, की भारतीय ग्राँप्रिचं जगभरात जल्लोषात स्वागत झालंय.

close