रेल्वेचा अनमोल खजिना

November 5, 2011 5:16 PM0 commentsViews: 1

05 नोव्हेंबर

मध्य रेल्वेनं प्रवास करणारे लाखो प्रवासी रोज सीएसटी (CST) स्टेशनला भेट देत असतात. वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा असणारं सीएसटी स्टेशन आता आपला इतिहास घेऊन मुंबईकरांसमोर आलंय. सीएसटी स्टेशन बिल्डिंगच्या ग्रँन्ड स्टेअरकेसच्याजवळ ही हेरिटेज गॅलरी सुरु झालीय. सुरक्षेच्या कारणावरुन ही गॅलरी सर्वसामान्यांना खुली नाही. पण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकार्‍यांच्या परवानगीनचं हा मध्य रेल्वेचा खजिना तुम्हाला पाहता येऊ शकतो.

close