केजरीवाल यांच्या समर्थकांनी निदर्शकांना झोडपले

November 6, 2011 11:13 AM0 commentsViews: 1

06 नोव्हेंबर

आज नागपुरात इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या शाखेच्या वतीनं वसंतराव देशपांडे सभागृहात अरविंद केजरीवाल यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण याच कार्यक्रमात केजरीवाल यांचं भाषण सुरू असताना सभागृहाबाहेर पन्नासच्यावर युवा घंटानाद संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून केजरीवाल यांचा निषेध केला. तसेच काळे झेंडे दाखवत केजरीवाल हे भाजपचे हस्तक असल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली. त्यानंतर इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन करणार्‍या कार्यकर्त्यांना झोडपलं. त्यानंतर युवा घंटानाद संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

close