लोकपाल बील म्हणजे जादूची छडी नव्हे – मुख्यमंत्री

November 6, 2011 11:36 AM0 commentsViews: 11

06 नोव्हेंबर

लोकपाल बील म्हणजे जादूची छडी नव्हे, छडी फिरवली की भ्रष्टाचार कमी होईल असं कोणी समजू नये, त्यासाठी मोठी यंत्रणा ऊभी करावी लागते असं परखड मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. भ्रष्टाचार प्रश्न राज्यसरकार आणि केंद्र सरकार मिळून यावर उपाययोजनेसाठी काम करत आहे. राज्यभरात लोकांचे, महिलांचे प्रश्न मोठे आहेत त्यांचा समस्या ते सोडवण्यासाठी सरकार कटीबध्द आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं नाशिकमध्ये बोलत होते.

close