बेळगावकरांनी केला कुंबळेचा सत्कार

December 14, 2008 4:30 PM0 commentsViews: 4

14 डिसेंबर बेळगावभारताचा माजी टेस्ट कॅप्टन अनिल कुंबळेचा बेळगावकरांच्या वतीनं जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. निम्मित होतं बेळगावच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या दीक्षा समारंभाचे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर कुंबळे पहिल्यांदाच बेळगावत आला होता.भारतात अजूनही क्रीडा वैद्यकीय क्षेत्राला प्रोत्साहन मिळत नसल्याबद्धल त्याने खंत व्यक्त केली. क्रीडा वैद्यक क्षेत्रात अद्ययावत सुधारणा झाल्यास त्याचा देशातील खेळाडूंनाही फायदा होईल असंही त्यानं यावेळी स्पष्ट केलं.आपल्या सत्कारबद्दल त्यानं बेळगाववासीयांचही जाहीर आभार मानले.

close